Police stripped the young women of their clothes and made them dance; Home Minister's shocking revelation in the Legislative Assembly about what happened in the Ladies Hostel in Jalgaon

मनसुख हिरेन या अंबानी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची संशयीत हत्या झाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून निलंबीत करा मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यानंतर पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आल्याची घोषणा गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी निलंबनाचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  मुंबई : मनसुख हिरेन या अंबानी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची संशयीत हत्या झाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून निलंबीत करा मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यानंतर पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आल्याची घोषणा गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.

  महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी निलंबनाचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. या गदारोळानंतर बुधवारी गृहमंत्र्यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते.

  बुधवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन ते चांगलेच आक्रमक झाले. सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी लावून धरलीय. जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

  सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप

  प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मयत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या पोलीसांना देण्यात आलेल्या जबाबातील काही मजकूर वाचून दाखवला. त्यात सचिन वा झे यांनी आपल्या पतीला अंबानी प्रकरणात अटक व्हावे म्हणून दबाव आणल्याचे म्हटल्याचे तसेच वाझे यांनीच खून केल्याचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, चाळीस लाख रूपयांच्या मिरा भाईंदर येथील जुन्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या धनंजय गावडे यांच्याकडे हिरेन यांचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. तसेच वाझे आणि गावडे हे त्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे वाझे यांना कलम २०१ अन्वये तातडीने अटक करून चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली. यावेळी भाजप सदस्य आक्रमक झाले त्यांना वेलमध्ये येवून आक्रमक पणे घोषणाबाजी सुरू केली.

  काय आहे प्रकरण

  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली होती, ती चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. मनसुख हिरेन या कारचे मालक होते. त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा शुक्रवारी अचानक मृतदेह आढळल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला.