भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर अटकेची कारवाई

शनिवारी सकाळी कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला. त्याचवेळी भातखळकर यांनी तिथे धाव घेत विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्‌ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला.

    मुंबई : एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईविरोधात भाजपा चांगलीच आक्रमक झाली. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दम्यान, याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    शनिवारी सकाळी कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला. त्याचवेळी भातखळकर यांनी तिथे धाव घेत विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्‌ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला.

    हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलिस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असेही भातखळकर यांनी सांगितले.