चांदीची चप्पल आणि दुचाकी…. भाजप आमदाराने केला कार्यकर्त्यांचा पाय धुवून चंदेरी सत्कार

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पाय धुवून चंदेरी सत्कार केला आहे. यावेळी त्यांनी या कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि दुचाकी भेट म्हणून दिली. या अनोख्या सोहळ्याची सांगलीत जोरदार चर्चा रंगली आहे.

    सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पाय धुवून चंदेरी सत्कार केला आहे. यावेळी त्यांनी या कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि दुचाकी भेट म्हणून दिली. या अनोख्या सोहळ्याची सांगलीत जोरदार चर्चा रंगली आहे.

    सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या झरे गावात पार पडलेला हा सत्कार सोहळा साऱ्या पंचक्रोशीत चर्चेत आहे. पडळकर यांनीच या सत्कार सोळ्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायात ही चांदीची चप्पल घातली.

    पडळकर यांच्या दोघा कार्यकर्त्यांनी ते आमदार व्हावेत यासाठी ‘पण’ केला होता. जोपर्यंत गोपीचंद पडळकर आमदार होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा ‘पण’ या कार्यकर्त्यांनी केला. तर, सलून व्यासायिक असलेल्या त्यांच्या आणखी कार्यकर्त्याने केस, दाढीचे पैसे न घेण्याचा पण केला होता. अशा या निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार पडळकर यांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता.

    चप्पल न घालणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि दुचाकी प्रदान केली. तर केस व दाढीसाठी पैसे न घेणाऱ्या कुटुंबाला दुचाकी भेट देण्यात आली.