पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप आमदार नितेश राणे याची व्टिट करत दिलगिरी

वसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभेत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरून भाजप आमदार नितेश राणे यानी व्टिट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानभवनाच्या प्रांगणात प्रतिरूप विधानसभेत भाषण करताना काल आमदार नितेश राणे यानी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आणि रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला आणि माफीची मागणी केली.

    मुंबई : पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभेत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरून भाजप आमदार नितेश राणे यानी व्टिट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानभवनाच्या प्रांगणात प्रतिरूप विधानसभेत भाषण करताना काल आमदार नितेश राणे यानी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आणि रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला आणि माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावे, असा इशाराही त्यांनी दिला.

    भावना दुखावल्या गेल्याने शब्द मागे घेतो

    त्यानंतर नितेश राणे यानी व्टिट करत शब्द मागे घेतले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘विधान भवनाबाहेर काल भाषण करताना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असेही नीतेश राणे यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे.

    ठाकरे यांचे वंशज आहेत का?

    दरम्यान कालच्या भाषणात नितेश राणे म्हणाले होते की, आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल. त्यांच्या या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. नीतेश राणेंच्या त्या वक्तव्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी राडा केला.  त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असे ट्विट करण्यात आले आहे.