भाजपचे खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांना कोरोनाची (corona) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट (tweet) करून ही माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये (Isolation) राहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले आहे.

 मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांना कोरोनाची (corona) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट (tweet) करून ही माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये (Isolation) राहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल. असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत कोरोनानं अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत.