पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे नोटा मोजण्याचं मशीन सापडलं. वाझेंकडे नोटा मोजण्याचं मशीन का होतं? नोटा मोजण्याच्या मशीनचा उद्देश काय, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केलाय. सचिन वाझे कुठल्या आर्थिक व्यवहारात गुंतले होते, असा सवाल भाजपनं विचारलाय. 

    वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरून सुरू झालेला वाद राजकीय वर्तुळात अधिकच वादग्रस्त होताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वाझेंच्या वादग्रस्त कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता भाजपच्या इतर नेत्यांनी सचिन वाझे प्रकरणावरून प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलीय.

    पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे नोटा मोजण्याचं मशीन सापडलं. वाझेंकडे नोटा मोजण्याचं मशीन का होतं? नोटा मोजण्याच्या मशीनचा उद्देश काय, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केलाय. सचिन वाझे कुठल्या आर्थिक व्यवहारात गुंतले होते, असा सवाल भाजपनं विचारलाय.

    सचिन वाझे जर पोलीस मुख्यालयात बसून कारवाया करत होते, तर हा प्रकार सरकारच्या पाठिंब्याशिवाय घडू शकत नाही, असं राम कदम यांनी म्हटलंय. भाजपनं सवाल उपस्थित केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवरचा दबाव वाढत चालला असून सचिन वाझेंची हकालपट्टी होणारी की पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केली जाणार, याची जोरदार चर्चा सुरू झालीय.