chitra wagh and sanjay rathod

“तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, थोडी लाज तरी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही” ,असे चित्रा वाघ(chitra wagh) यांनी संजय राठोड(sanjay rathod) यांना उद्देशून म्हटले आहे.

    मुंबई :  भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ (chitra wagh criticizes sanjay rathod)यांनी मंत्री संजय राठोड(sanjay rathod) यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, थोडी लाज तरी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही” ,असे चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना उद्देशून म्हटले आहे.

    चित्रा वाघ म्हणाल्या की, “संजय राठोड यांच्या पाठराखणीसाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आत्ता जशी एकी दिसली ती भंडारा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणामध्ये दिसली नाही. बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. वाह रे बहाद्दर सरकार”.

    चित्रा वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, “पूजा चव्हाणला मारणारे संजय राठोड आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा समाजाला समोर करून बचाव करण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये संजय राठोड याने आपल्या पापाची कबुली दिली आहे”.

    त्या पुढे म्हणाल्या की, “तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, थोडी लाज बाळगा. ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी थातुरमातुर उत्तर दिले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित संजय राठोड आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही चौकशी केली जात नाही, त्यामुळे तो अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहोत.”