खत दरवाढी विरोधात पत्र लिहिणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचे व्टिट

खत दरवाढी विरोधात पत्र लिहिणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालीन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले,' असा आरोप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.  

    मुंबई : देशात खत दरवाढ लागू होताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांना हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असून ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी,’ असे पत्र पाठवले होते.  त्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे गौडा यांनी आवर्जून पवार यांना कळविले होते. मात्र प्रदेश भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र व्टिट करत शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

    दरवाढीला मोकळे रान पवारांमुळेच

    त्यांनी म्हटले आहे की, आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहिणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालीन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले,’ असा आरोप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

    त्यांनी व्टिट केले आहे की, ‘युपीए काळात ज्यात शरद पवार कृषिमंत्री होते त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले,’