शिवसेनेला भुजबळ, भास्कर जाधव चालतात, पण नारायण राणेंना विरोध ? व्टिट करत उपाध्येंचा सवाल

बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसवर(Congress) टीका केली, त्या काँग्रेसच्या वळचणीला सत्तेसाठी बसता येते, बाळासाहेबांना अटक करणारे, त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरणारे छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आता शिवसेनेला गोड झालेत. शिवसेना सोडणारे भास्कर जाधव देखील चालतात, पण बाळासाहेबांना वंदन करायला येणारे नारायण राणे यांना विरोध केला जातो. ही शिवसेनेची कुठली भूमिका आहे, असा सवाल उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या(Narayan Rane) जन आशीर्वाद यात्रेत(Jan Ashirwad Yatra) शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला वंदन करण्यास शिवसैनिकांनी विरोध दर्शवला. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye Tweet) यांनी एक व्टिट करत शिवसेनेला सवाल केले आहेत.

    बाळासाहेब ठाकरेंना संकुचित करू नका
    बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसवर टीका केली, त्या काँग्रेसच्या वळचणीला सत्तेसाठी बसता येते, बाळासाहेबांना अटक करणारे, त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरणारे छगन भुजबळ आता शिवसेनेला गोड झालेत. शिवसेना सोडणारे भास्कर जाधव देखील चालतात, पण बाळासाहेबांना वंदन करायला येणारे नारायण राणे यांना विरोध केला जातो. ही शिवसेनेची कुठली भूमिका आहे, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते. त्यांना संकुचित करू नका,’ असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

    बाळासाहेबांचे नाते अतूट
    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा २०१५मध्ये पराभव करणाऱ्या भाजपवासी झालेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनीही शिवसैनिकांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘बाळासाहेब हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते. बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकाप्रमाणे आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांचे नाते अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही. जुना शिवसैनिक मोठा होतो, याचे खरेतर स्वागत व्हायला हवे,’ असे तृप्ती सावंत यांनी म्हटले आहे.