…म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा घसा कोरडा पडेपर्यंत आरडा ओरडा; भाजप नेत्याचा गंभीर आरोप  

मुंबई : उत्तरप्रदेशात इंटरनॅशनल फिल्मसिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केल्यानंतर चित्रपट सृष्टीतील अनुभवी व दिग्गज कलाकारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत आले. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराचा कावळा करत त्यांच्या दौऱ्यावर घसे कोरडा पडेपर्यंत आरडा ओरड केली असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केला आहे.

महाआघाडी सरकार एक वर्ष पुर्ण करताना आलेल्या अपयशाची चर्चा या निमित्ताने पडद्याआड होईल या उद्देशाने राज्यातील जनतेचे लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला असल्याची टीका कुलकर्णी यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारण नसताना या दौऱ्याचं राजकीय भांडवल करत राजकारण करण्याचा डाव शिवसेना आणि काँग्रेस तथा राष्ट्रवादी पक्षाच्या लोकांनी केला. असा आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे.