‘बाते बडी बडी, काम का कूछ पता नहीं’ मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या : भाजप प्रवक्त्यांचे ट्विट!

मुख्यमंत्र्याच्या फेसबुक लाईव्हद्वारे निशाणा साधताना मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  म्हटले आहे की, “राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे, तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली, त्यांची यादी कुठे आहे?, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नाव नोंदविले त्याना लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री देत नाहीत, कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे अशी टिका त्यानी केली. १२ कोटी लसी देण्यासाठी एकरकमी चेक देणारे. इथल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

    मुंबई: भारतीय जनता पक्षाचे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादावरून टिका केली आहे. उपाध्ये यांनी व्टिट करत मुख्यमंत्र्यांना काही सवालही केले आहेत.  त्यांनी म्हटले आहे की, “ मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या. ना कोणती उत्तरे ना कोणती दिशा. १२ कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना, पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? पाच लाख लसी महाराष्ट्रात दिल्याच नाहीत, मग तरी त्याची घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का कूछ पता नहीं हे या राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे,” असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

    मुख्यमंत्र्याच्या फेसबुक लाईव्हद्वारे निशाणा साधताना मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  म्हटले आहे की, “राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे, तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली, त्यांची यादी कुठे आहे?, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नाव नोंदविले त्याना लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री देत नाहीत, कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे अशी टिका त्यानी केली. १२ कोटी लसी देण्यासाठी एकरकमी चेक देणारे. इथल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

    १५ दिवस कडक निर्बंध वाढवताना काही ठोस माहिती घेऊन येतील असे वाटले होते. सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणारे मुख्यमंत्री त्याची तयारी मात्र काहीच न करता केवळ हे सुरू, ते सुरू अशी गोल गोल भाषा वापरतात. रिक्षाचालकांना मदतीची जी घोषणा केली होती, ती रक्कम देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

    रेमडेसिवीर व आँक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते, मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात, हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये,” असा इशाराही उपाध्ये यावेळी सरकारला दिला