भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार, निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युती होणार ?

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या जवळीक वाढलेल्या आहेत. याआधी नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. त्यानंतर उद्या चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची भेट होणार आहेत. कारण येत्या सहा महिन्यांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकेंच्या निवडणुका आहेत. 

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (शुक्रवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने भाजप आणि मनसेमध्ये युतीच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या जवळीक वाढलेल्या आहेत. याआधी नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. त्यानंतर उद्या चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची भेट होणार आहेत. कारण येत्या सहा महिन्यांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकेंच्या निवडणुका आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार का? अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

    राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु राज ठाकरे यांनी मला त्यांच्या एका हिंदी भाषणाची क्लिप पाठवल्याचं पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, राज यांनी ते नाकारलं होतं. मी अशी कुठलीही क्लिप पाठवली नव्हती. ती क्लिप त्यांच्याकडं कशी गेली मला माहीत नाही. शिवाय, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. चालता चालता भूमिका बदलत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.