आमदार सदाभाऊ खोत
आमदार सदाभाऊ खोत

भाजपाचे सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना नाराज असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची बैठकी दरम्यान मनधरणी करण्यास यश आले. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेकडून उमेदवार प्राध्यापक एन.डी चौगुले (सर) यांची माघार घेत भाजपाला पाठिंबा देत आहे. भाजपाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांचा रयत क्रांती संघटनेकडून ताकतीने प्रचार करून मतदान देणार असल्याचे सदाभाऊ खोत साहेब यांनी सांगितले. 

मुंबई (Mumbai).  भाजपाचे सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना नाराज असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची बैठकी दरम्यान मनधरणी करण्यास यश आले. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेकडून उमेदवार प्राध्यापक एन.डी चौगुले (सर) यांची माघार घेत भाजपाला पाठिंबा देत आहे. भाजपाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांचा रयत क्रांती संघटनेकडून ताकतीने प्रचार करून मतदान देणार असल्याचे सदाभाऊ खोत साहेब यांनी सांगितले.

          चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, भारतीय जनता पार्टीत सदाभाऊ खोत यांना मानाचे स्थान आहे. यापुढील काळात देखील पक्षात आणि सत्ते मध्येही सदाभाऊ यांना सन्मान देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सदाभाऊ खोत यांच्यावर विशेष प्रेम आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोत रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासो पाटील रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे रयत क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुहास पाटील रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष किरण उतळे नंदकुमार पाटील, सत्यजित जाधव, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण गावडे रयत क्रांती वाहतूक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश माने रयत क्रांती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तानाजी जगताप (नाना) रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश राणे रयत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला सुरज जगताप यास पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.