शिवराय आणि संभाजी महाराज यांच्या एकेरी नामोल्लेखाने आराध्य दैवतांचा अवमान ; हसन मुश्रीफ यांना माफी मागण्याचा भाजपचा इशारा

कागल येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या शाळेत शिष्यवृत्ती सराव चाचणी परिक्षेत छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांचा ऐकेरी उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ संतापजनक नसून निषेधार्ह देखील आहे, त्यामुळे मुश्रीफ यांनी ही प्रश्नपत्रिका तात्काळ मागे घेवून जनतेची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

    मुंबई :  राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांच्या एकेरी नामोल्लेख केल्याने देशाच्या आराध्य दैवतांचा अवमान केला आहे, त्याबद्दल तातडीने माफी मागावी अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

    छत्रपतींचा एकेरी उल्लेख

    याबाबत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कागल येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या शाळेत शिष्यवृत्ती सराव चाचणी परिक्षेत छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांचा ऐकेरी उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ संतापजनक नसून निषेधार्ह देखील आहे, त्यामुळे मुश्रीफ यांनी ही प्रश्नपत्रिका तात्काळ मागे घेवून जनतेची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

    सातत्याने हिंदुत्व विरोध

    भातखळकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सातत्याने हिंदू विरोधी सामाजिक तेढ निर्माण करणा-या प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. सात त्याने महापुरूषांचा अवमान करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. हिंदुच्या उत्सवांवर निर्बंध आणले जात आहेत, एवढेच नाही तर आषाढी यात्रेसाठीच्या बसला देखील वारक-यांना भाडे  आकारण्यात आले. अशी सात त्याने हिंदू विरोधी कृत्य ठाकरे सरकार मध्ये होत असून आता तर हिंदुचे दैवत असलेल्या छत्रपतींचा अवमान करण्यात आला आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही असे सांगत त्यानी माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.