सरनाईक प्रकरणामुळे भाजप आक्रमक होणार; शिवसेनेच्या सर्व आमदारांना अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहण्याची तंबी

या अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे असा पक्षादेश पक्ष प्रतोद सुनील प्रभू यानी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे आमदारांना  जारी केला आहे.

    मुंबई :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या त्या बहुचर्चित पत्रानंतर शिवसेनेच्या आमदारांमधील अस्वस्थता स्पष्ट झाली आहे.  विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात पाच आणि सहा जुलै कामाकाजात विरोधी भाजप आक्रमक होणार आहे. त्यावेऴी शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहण्याबाबत, पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला आहे.

    विनियोजन विधेयकावर चर्चा मतदान

    या अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे असा पक्षादेश पक्ष प्रतोद सुनील प्रभू यानी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे आमदारांना  जारी केला आहे.

    विधानसभा अध्यक्ष निवड?

    विधिमंडळाच्या या अधिवेशनात नियमित कामकाजासोबत विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता असल्याने सेनेच्या या व्हिपला महत्व प्राप्त झाले आहे. या शिवाय मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज संस्थांमधील रद्द झालेले अतिरिक्त आरक्षण, कोरोना लसीकरण, अनिल देशमुख प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे घटलेलेइत्यादी मुद्यावर आक्रमक विरोधकांमुळे महाविकास आघाडी सरकारपुढे आव्हान उभे राहणार आहे.

    या अधिवेशनात पुरवणी मागण्या म्हणजे मनी बिल मंजूर होणार असल्याने त्यावेळी तीनही पक्षाचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे तीनही पक्षाचे मुख्य प्रतोद आणि प्रतोद (व्हीप) यांच्या आदेशानुसार आमदारांना भूमिका मांडणे अनिवार्य मानले जाते.कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावल्यास त्यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होऊ शकते.