भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसाला चोपले; राम कदम फोन करुन म्हणतात त्यांना सोडून द्या

पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडवल्यामुळे भाजप नेते राम कदम पून्हा एकदा अडचणीत आले आहेत. डायरेक्ट पोलिसाला फोन करुन आरोपींना सोडून द्या अशी मागणी राम कदम यांनी केली. या फोन कॉलची ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे.

मुंबई : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडवल्यामुळे भाजप नेते राम कदम पून्हा एकदा अडचणीत आले आहेत. डायरेक्ट पोलिसाला फोन करुन आरोपींना सोडून द्या अशी मागणी राम कदम यांनी केली. या फोन कॉलची ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे.

सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी या आरोपींची नावं आहेत. ते दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते. याशिवाय त्यांनी एका वाहनालाही धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, यानंतरही आरोपींकडून कायद्याचं उल्लंघन केलं जात होतं. पोलीस रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसंच मारहाण केली.

यानंतर राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे. माझ्याजागी तुम्ही असता तर काय केलं असतं? त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. माझाही आत्मसन्मान आहे,” असं पोलीस कॉन्स्टेबल बोलताना ऐकू येत आहे. यावेळी त्याने आपण तुमची मदत करु शकत नाही असं पोलिस म्हणाले. ही ऑडियो क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे.

आरोपी घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. याशिवाय ते भाजपाच्या आयटी सेल आणि इतर विभागांमध्येही काम करतात.

दरम्यान, शिवसैनिकांनी राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तर, काँग्रेस नेते सचिन सावंत राम कदम यांचा संतापजनक संवाद असे म्हणत ऑडिओ क्लीप ट्विटरवर शेअर केली आहे. त्या पोलिस कॉन्स्टेबलने दिलेले उत्तर अभिमानास्पद आहे. “मला महाराष्ट्र पोलीसांचा स्वाभिमान जपायचा आहे. मला माझाही स्वाभिमान जपायचा आहे” असे ट्विटही त्यांनी केले आहे.