जन आशिर्वादयात्रेत भाजपच्याच कार्यकर्त्यांची नारायण राणें विरोधात घोषणाबाजी

वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. अशा काळात पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांच्या दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवून १९९० च्या दशकात भाजपने पाय रोवले.

    केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशिर्वादयात्रे दरम्यान विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे काही नाराज झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. भाजपने ज्यांच्या गुंड प्रवृत्तीला एवढी वर्ष विरोध केला त्यांचीच भेट राणेंनी घेतली. मात्र, प्रेमाने त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना राणेंनी ताटकळत ठेवलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी राणें विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली.

    या घोषणा देणाऱ्यांमधे फक्त कार्यकर्तेच नाही तर विरारचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाच्या बाहेर भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

    वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. अशा काळात पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांच्या दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवून १९९० च्या दशकात भाजपने पाय रोवले. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्यां विरोधात निवडणुका लढल्या होत्या. त्यामुळे, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने नाराज झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

    दरम्यान, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नारायण राणेंनी ही भेट 45 वर्षाच्या मैत्रीची असल्याचे सांगितले आहे.