मंदिरे उघडण्याचा भाजपाचा अजेंडा, आघाडी सरकारने केला हायजॅक

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्यानुसार राज्यसह मुंबईतील प्रार्थनास्थळे उघडली. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आज सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनीही आज प्रार्थना स्थळांना भेटी दिल्या. भाजपने राज्यभर राज्य सरकारच्या विराेधात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदाेलन केले.

  मुंबई – काेराेना नियंत्रणात आल्यानंतर भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ घंटानाद आदाेलन केले. घटस्थापनेपासून राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्यानुसार आज मंदिरांसह सर्वच प्रार्थनास्थळे खुली झाली. मात्र मंदिरे उघडण्याचा हिंदूत्वाचा भाजपाचा अजेंडा आज महाविकास आघाडी सरकारने हायजॅक केल्याचे दिसून आले.

  घटस्थापनेपासून राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्यानुसार राज्यसह मुंबईतील प्रार्थनास्थळे उघडली. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आज सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनीही आज प्रार्थना स्थळांना भेटी दिल्या. भाजपने राज्यभर राज्य सरकारच्या विराेधात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदाेलन केले.

  मात्र मंदिरे उघडण्याच्या आजच्या दिवशी भाजपला या विषयाचे काेणतेही श्रेय घेवू न देता महाविकास आघाडीतील नेत्यांतील भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडाच हायजॅक केल्याचे आज दिसून आले. आजही भाजपाचे नेते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये रमले असून भाजपने मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर रान उठविले हाेते. आज ती संधी भाजपाला चालून आली हाेती. मात्र भाजपला बेसावध ठेवून आघाडीच्या नेत्यांनी मंदिरे खुले करण्याच्या निर्णायाचे श्रेय घेतले.

  काेराेना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने नियमांत शिथिलता आणत अनेक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली हाेती. मात्र, भाजपने मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने केली. त्या घंटानाद आंदाेलनात भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी मंदिरांसमोर आंदाेलने केली हाेती. आपल्या आंदाेलनामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची कुरघाेडी करून जनतेसमाेर पुन्हा जाता आले असते. मात्र भाजपच्या नेत्यांनी आणि नेत्यांनी ती संधी गमावल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

  मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर ही व्यवस्था केली तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.