भाजपची आक्रमक राहण्याची रणनिती; आशिष शेलार यांनी मांडली भूमिका

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कोरोना उपाय योजनांसह आरक्षणाच्या या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचे काम आम्ही करु, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यानी दिली.  शेलार म्हणाले की, राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झाले असते तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारने अजून छोटे अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोनच दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे.

    मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कोरोना उपाय योजनांसह आरक्षणाच्या या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचे काम आम्ही करु, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यानी दिली.  शेलार म्हणाले की, राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झाले असते तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारने अजून छोटे अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोनच दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे.

    शेलार म्हणाले की, नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

    या पोटनिवडणुकीतही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठीही बैठकीत रणनिती आखण्यात आली.