भाजपचे आंदोलन सत्तेचे दार उघडण्यासाठी मंदिरासाठी नव्हे, वंचित बहुजन आघाडीची टीका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाने केलेल्या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत. प्रकश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपाने केलेल आंदोलन धार्मिक स्थळे, उघडण्यासाठी नाही तर सत्तेसाठी होते. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

मुंबई : भाजपाने शनिवारी दार उघड ‘उद्धवा’ दार उघड हे आंदोलन राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद करत केले. यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार टीका करण्यात आली आहे. (BJP’s agitation is not for the temple to open)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाने केलेल्या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत. प्रकश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपाने केलेल आंदोलन धार्मिक स्थळे, उघडण्यासाठी नाही तर सत्तेसाठी होते. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिरे उघडण्यात परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाने राज्यात विविध ठिकाणी ‘दार उघड उद्धवा’ हे आंदोलन केले. तसेच मंदिरांच्या बाहेर घंटानाद केला. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी केली होती.

प्रकाश आबंडकर यांच्या मागणीला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजपने आंदोलन केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.