Thackeray government's pressure increased; What will the governor decide in the name of the 12 MLAs recommended by the government?

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांमागे ईडी, सीबीआय चौकशीचा लागलेला ससेमिरा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जोरबैठका पार पडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही एका गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढचे 30 दिवस महाविकास आघाडी सरकारसाठी महत्वाचे मानले जात आहेत.

    मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांमागे ईडी, सीबीआय चौकशीचा लागलेला ससेमिरा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जोरबैठका पार पडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही एका गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढचे 30 दिवस महाविकास आघाडी सरकारसाठी महत्वाचे मानले जात आहेत.

    राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होऊ घातले आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी काटेकोर नियोजन केल्याचे दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपआपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. निवडीवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीकडून सावध पावले टाकली जात आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपआपल्या आमदारांना फोन करूनही अधिवेशनाला हजर राहण्यासाठी बजावले आहे.

    काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी सर्व आमदारांना संपर्क सुरू केला आहे. तीन पक्षाचे प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना फोन करुन संपर्क साधला. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक या विषयाबरोबरच पुरवणी मागण्या, विधेयके मंजुरी यासाठी सभागृहात बहुमत रहावे यासाठी आमदारांशी संपर्क सुरू आहे. कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.