मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

    मुंबई:  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    आज दुपारनंतर भाजपची ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते.