संभ्रम निर्माण करायचे काम भाजपाचे; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

राज्यात भाजपाची सत्ता येणार ही भाजपाची भविष्यवाणी सत्य होत नाही. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये म्हणून भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत, , अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

  मुंबई : राज्यात भाजपाची सत्ता येणार ही भाजपाची भविष्यवाणी सत्य होत नाही. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये म्हणून भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत, , अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

  राज्यत तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. मात्र सत्ता येणार, सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपाचे नेते करत असल्याची टीका त्यांनी केली.

  एकवेळ केंद्रातले सरकार पडेल, पण…

  फडणवीसांनी माधम्यांशी बोलताना सत्तांतराबाबतचा नवा मुहूर्त सांगितला होता. सध्या आपण कोविड मधून चाललो आहोत. एकदा कोविडची लढाई संपली की मग या गोष्टींमध्ये लक्ष घालू, असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोचक प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनानंतर केंद्रातील सरकार पडणार का ? असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

  तसेच, ‘फडणवीस हे वकील आहेत, त्यामुळेच ते याबाबत तारीख पे तारीख देत आहेत. मेगा भरतीतून आलेले आमदार पक्षात टिकवण्यासाठी ते अशी विधान करत आहेत. मात्र, एकवेळ केंद्रातले सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही, असा दावा देखील पटोले यांनी केला आहे.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा