प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटेही होते परंतु पंतप्रधान मोदीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत स्वतंत्र बैठकीत चर्चा केली होती. बंदद्वार झालेल्या या चर्चेनंतरच शिवसेना-भाजपामधील वितुष्ट कमी होऊ लागल्याची चर्चा रंगली. त्यानंतर बंदद्वार बैठकांचा क्रमच सुरू झाला आहे.

    मुंबई : विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असतानाही विरोधी बाकांवर बसणे भाजपाला अवघड जात आहे. पावणे दोन वर्षाच्या कालावधीत सत्ता स्थापन करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणारा भाजपा आता शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पक्षातर्फे शिवसेनेला केंद्र आणि राज्यात एकत्रत येण्याचा प्रस्ताव दिला आहे तथापि शिवसेना यासाठी तयार नसल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आणि सीबीआयला घाबरणार नसल्याचा संदेशच शिवसेनेने दिला आहे. महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचाही ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

    वितुष्ट कमी झाल्याची चर्चा

    गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटेही होते परंतु पंतप्रधान मोदीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत स्वतंत्र बैठकीत चर्चा केली होती. बंदद्वार झालेल्या या चर्चेनंतरच शिवसेना-भाजपामधील वितुष्ट कमी होऊ लागल्याची चर्चा रंगली. त्यानंतर बंदद्वार बैठकांचा क्रमच सुरू झाला आहे.

    राऊत यांची दिल्ली दरबारी ‘गुप्तभेट’

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शाह यांच्या निवासस्थानातूनच फडणवीस यांनी फोनवरून पंतप्रधान मोदींसोबतही चर्चा केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले. त्यांनीही बंदद्वार चर्चा केली परंतु त्याची वाच्यताच झाली नाही. परंतु सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राऊत दिल्लीत भाजपा नेत्यांची भेट घेण्यासाठीच गेले होते. राऊत व शेलार यांच्यातही चर्चा झाल्यानंतर खळबळ उडाली होती, तथापि, राऊतव शेलार यांनी मात्र याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.