बेळगाव निकालावर भाजपने पेढे वाटणे म्हणजे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव; संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजप ने पेढे वाटले हे 105 हुतात्म्यांच दुर्दैव आहे.एकीकरण समितीत फाटाफूट केली वार्ड पुनर्वरचना केली प्रचाराला वेळ मिळू दिला नाही, सत्तेचा दुरुपयोग झाला, एकीकरण समितीचा पराभव भाजपने घडून आणला असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केला आहे.

    मुंबई : शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाने कैद केले तेव्हा महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती, तरी महाराष्ट्रातील काही लोकांनी आनंद व्यक्त केला होता तसा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महानगर पालिकत पराभव झाला राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.

    तसेचं एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजप ने पेढे वाटले हे 105 हुतात्म्यांच दुर्दैव आहे.एकीकरण समितीत फाटाफूट केली वार्ड पुनर्वरचना केली प्रचाराला वेळ मिळू दिला नाही, सत्तेचा दुरुपयोग झाला, एकीकरण समितीचा पराभव भाजपने घडून आणला असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केला आहे.