मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर जे आंदोलन झालं त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला. बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.

राज्यभरात आज भाजपने मंदिर (BJP’s state-wide agitation) उघडा आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. भाजपने आज सकाळी ११ वाजता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) दारात घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर जे आंदोलन झालं त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला. बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.

पुण्यात शहर भाजपच्या वतीने आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. शहराचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर विविध वाद्यांचा गजर करत हे आंदोलन करण्यात आलं. सांगलीत भाजपाच्या अध्यामिका आघाडीच्या वतीने आज सकाळी दहा वाजता गणपती मंदिरासमोर टाळ-मृदंग वाजवून सरकारला जागे करण्यासाठी कीर्तनकार, भक्तमंडळी, वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार सहभागी झाले आहेत.

हॉटेल, बार, मॉल सुरु केले असले तरी मंदिर बंद ठेवल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या वतीने आज कोल्हापुरातील शेष नारायण मंदिराबाहेर निदर्शनं केली जात आहे.