प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मुंबईत शेतकरी कायद्याला होणार विरोध आणि भारत बंद आंदोलन या मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवण्याची भाजपने रणनीती आखली आहे. शेतकरी कायद्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याची रणनीती भाजप आखत आहे. आमदार-खासदार- पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्यामार्फत लोकांमध्ये जात शेतकरी कायदा कसा उपयुक्त आहे, योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न यापुढच्या काळात केला जाणार आहे.

मुंबई (Mumbai).  मुंबईत शेतकरी कायद्याला होणार विरोध आणि भारत बंद आंदोलन या मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवण्याची भाजपने रणनीती आखली आहे. शेतकरी कायद्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याची रणनीती भाजप आखत आहे. आमदार-खासदार- पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्यामार्फत लोकांमध्ये जात शेतकरी कायदा कसा उपयुक्त आहे, योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न यापुढच्या काळात केला जाणार आहे.

या प्रचारासाठी कुठलाही मुहूर्त न निवडता स्थानिक पातळीवर खास करून ग्रामीण भागात जनजागृती मोहीम अंमलात आणण्याची रणनीती भाजप तयार करत आहे. तर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ‘रयत क्रांती संघटनेने आवाहन करताना दिल्लीतील आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असून, केंद्राच्या शेतकरीहिताच्या कायद्यांचा अन्वयार्थ जनतेला समजावून सांगण्यासाठी कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रयत संघटना मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे.

 सदाभाऊ खोत म्हणाले, की दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या उद्रेकात शेतकरी अत्यल्प आणि बाजार समित्यांशी संबंधित घटकच जास्त शिरले आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यात शेतकरीहितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला आहे, ही बाब सामान्यांच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय शांत बसणार आहे. केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून अखेरीस शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे.

या कायद्यांमुळे शेतमालाच्या विक्रीसाठी जागेचे बंधन नसेल, शेतीविषयक करारांमुळे मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असेल, बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहणार असून, करारांसाठी स्वतंत्र लवाद असणार आहे. या कायद्यांचे सार म्हणजे परकीय क्षेत्रातील गुंतवणूक शेती व्यवस्थेत वाढेल. यातून तंत्रज्ञानाधारित शेतीस चालना मिळून उत्पादकताही वाढीस लागणार आहे, असा दावाही खोत यांनी केला.