खड्ड्यांसाठी भाजपाचे अनोखे आंदोलन

मागील काही महिन्यांपासून मुंबई, उपनगर तसेच ठाणे, कल्याण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. तसेच खड्ड्यांबाबत होत असलेली बैठक म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

    मुंबई : मुंबईतील खड्डे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. खड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत कलगीतुरा रंगल्याचे आपण पाहिले आहे. तसेच सध्या खड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक होत आहे. त्यामुळं मुंबईतील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये मुंबईकरांनो, आपल्या व्यथा मांडा. आपल्या हक्कासाठी लढा. आम्ही होऊ तुमचे माध्यम. विचारू तुमचा टॅक्सचा पैसा खड्डात घालणाऱ्यांना जाब. खड्ड्यांचे फोटो आणि व्हीडीओ आम्हाला वॅाट्सअप करा. – ९३२१८१२२९०, या नंबरवर, असे सांगत खड्ड्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन केले आहे.

    मागील काही महिन्यांपासून मुंबई, उपनगर तसेच ठाणे, कल्याण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. तसेच खड्ड्यांबाबत होत असलेली बैठक म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे. संजय राऊत जिथे जातात तिथे भाजपची सत्ता येते. संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू जुळे भाऊ आहेत. एकीकडे सिद्धू काँग्रेसला संपवत आहेत, तर संजय राऊत शिवसेनेला बुडवणार आहेत, या शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली.

    दुसरीकडे, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. गेल्या ३२ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. मुंबई महापालिकेचे बजेट प्रचंड आहे. असे असले तरी मुंबईतील खड्ड्यांबाबत आतापर्यंत काहीही ठोस करण्यात आल्याचे पाहायला मिळत नाही. स्टॅडिंगमध्ये अंडस्टॅडिंग होते. काळ्या यादीत असलेल्यांनाही कंत्राटे मिळतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंमत करून कलानगर, मातोश्रीच्या जवळ असलेल्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार का, असा प्रश्न भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला