BKC-C link flyover to open; The work is almost complete

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बीकेसी-सी लिंक उड्डाणपूल सुरू करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसीपर्यंत ७२५ मीटर लांबीच्या नवीन उड्डाणपूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करण्यात येतील, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले.

    मुंबई : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बीकेसी-सी लिंक उड्डाणपूल सुरू करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसीपर्यंत ७२५ मीटर लांबीच्या नवीन उड्डाणपूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करण्यात येतील, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले.

    एमएमआरडीएने या उड्डाणपूलाचे काम जानेवारी २०२० पासून सुरू केले होते. या पुलाचे काम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, कोरोनामुळे कामात उशीर झाला. सी लिंक-बीकेसी उड्डाणपुलाचा पहिला भाग फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर तिसरा उड्डाणपूल सायन­-धारावी लिंक रोड ते सी-लिंकच्या दिशेने ३४९ मीटर आहे. हा पूल नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या उड्डाणपुलाची व्याप्ती मेट्रो लाईन एकीकरण योजनेमुळे कमी झाली आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्चही कमी झाला आहे.

    सी लिंक-बीकेसी उड्डाणपूल ७२५ मीटर लांब आहे. यामध्ये दोन लेन असणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च १०३.७३ कोटी आहे. एमएमआरडीएच्या या प्रकल्पांतर्गत तीन उड्डाणपूल प्रस्तावित होते. मेट्रो मार्ग २ ‘बी’मुळे तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम प्रभावित झाले आहे.