‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; एका महिलेसह पाच जणांना अटक, लाखो रुपयांचे इंजेक्शन जप्त

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च युनिट १२ ने अन्न व औषध पुरवठा विभागाच्या मदतीने सापळा रचून गोरेगाव येथील न्यूयॉर्क तडका हॉटेलमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

    मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च युनिट १२ ने अन्न व औषध पुरवठा विभागाच्या मदतीने सापळा रचून गोरेगाव येथील न्यूयॉर्क तडका हॉटेलमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

    स्नेहा शाह (४६), शुभम बख्शी (२५), रोहित कांबळे (३२), अर्थव चेतन चिंतामणी (१९), दीपक वीर बहादुर खडका (२९) अशी आरोपींची नावे आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार, १०० मिलीग्रॅम रेमडेसिवीर इंजेक्शन तिप्पट दरात विकण्याप्रकरणी या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख २४ हजार ८०० किंमतीचे २६ इंजेक्शन जप्त केली आहेत.

    मुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांिगतले की, युनिट १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांना गोरेगावच्या न्यूयॉर्क तडका हॉटेलमध्ये काही जण कोरोनामध्ये प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन तिप्पट दरात विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एफडीए विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा रचून कारवाई केली.