Black, white and yellow fungus followed by 'Bone Death'! The bones became weaker after coronation

कोरोनातून बरे होणाऱ्या या आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये ‘बोन डेथ’चे तीन रुग्ण आढळले आहेत. बोन डेथला अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस असेही म्हटले जाते. मुंबईच्या माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात बोन डेथच्या तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचे वय ४० पेक्षा कमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यात बोन डेथ हा आजार झाल्याचे समोर आले आहे.

    मुंबई : जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरियंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या आजारांमुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्युकरमायकोसिससोबत आणखी एका आजाराने एन्ट्री केली आहे. म्युकरमायकोसिसनंतर मुंबईत ‘बोन डेथ’ या आजाराचे नवीन संकट उभे राहिले आहे.

    कोरोनातून बरे होणाऱ्या या आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये ‘बोन डेथ’चे तीन रुग्ण आढळले आहेत. बोन डेथला अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस असेही म्हटले जाते. मुंबईच्या माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात बोन डेथच्या तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचे वय ४० पेक्षा कमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यात बोन डेथ हा आजार झाल्याचे समोर आले आहे.

    बोन डेथ या आजारांमध्ये हाडे निकामी होतात. शरिरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. हे प्रामुख्याने या आजाराची लक्षणे आहेत. डॉक्टरांच्या मते, भविष्यात बोन डेथ या आजाराचे रुग्ण वाढू शकतात.

    हिंदुजा रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. संजय अग्रवाल बोन डेथ या आजाराबाबत म्हणाले की, रुग्णांना मांडीच्य हाडाला प्रंचड वेदना झाल्या. बोन डेथ झालेले तिन्ही रुग्ण पेशानं डॉक्टर आहेत. लक्षणे दिसताच या रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्यामुळे उपचार लगेच झाला. दरम्यान, म्युकरमायकोसिस आणि बोन डेथ या आजारांमध्ये स्टारॉयडस प्रमुख कारण आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्टारॉयडचा वापर सर्रास केला जात आहे. याचाच फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान, काळी बुरशी आणि बोन डेथ या आजारांमध्ये स्टारॉयड्स प्रमुख कारण आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्टारॉयड्सचा वापर सर्रास केला जात असल्याची माहिती हिंदुजा रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय अग्रवाल यांनी दिली. रुग्णांच्या मांडीच्या हाडाला प्रचंड वेदना झाल्याचे ते म्हणाले.