जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशीर्वाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

वरुण राजाच्या आशीर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनांचा आशीर्वाद घेऊन मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रकट करुन ही यात्रा जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरूवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन यात्रेला केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. जन आशीर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे.असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

    वरुण राजाच्या आशीर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनांचा आशीर्वाद घेऊन मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रकट करुन ही यात्रा जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे, असे फडणवीस म्हणाले.