नथुराम गोडसेंच्या समर्थनार्थ ट्वीट करणार्‍या लोकांचे अकाउंट ब्लॉक करा; मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती(Gandhi Jayanti) सगळीकडे उत्साहात साजरी होत आहे. अशातच देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ काही लोक ट्विटर वर जोरदार ट्रेड चालवत आहेत अशा लोकांना ताबडतोब ब्लॉक करावे तसेच सर्व अकाउंट ताबडतोब ब्लॉक करावे अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर( Minister Yashomati Thakur) यांनी ट्विटरकडे केली आहे.

    मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती(Gandhi Jayanti) सगळीकडे उत्साहात साजरी होत आहे. अशातच देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ काही लोक ट्विटर वर जोरदार ट्रेड चालवत आहेत अशा लोकांना ताबडतोब ब्लॉक करावे तसेच सर्व अकाउंट ताबडतोब ब्लॉक करावे अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर( Minister Yashomati Thakur) यांनी ट्विटरकडे केली आहे.

    पंतप्रधान जेव्हा देशाबाहेर जातात तेव्हा ते महात्मा गांधींच्या विचाराबाबत बोलत असतात. मात्र, देशातील काही समाजविघातक लोक नथुराम समर्थनात ट्रेंड चालू करण्याचा प्रयत्न करीत असतात. नथुराम गोडसेंच्या समर्थनार्थ ट्वीट करणार्‍या लोकांचे अकाउंट ब्लॉक करावेत असं यशोमती टाकूर म्हणाल्या.