हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन रक्तवाहिन्या ब्लॉक; सचिन वाझेंची वोक्हार्ट रुणालयात दाखल होण्यास परवानगी देण्याची मागणी

तळोजा कारागृहात असलेल्या वाझे यांने ह्रद्याच्या संबंधित त्रास असल्याने न्यायालयाच्या परवानगी नंतर 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्याकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीय करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात वैद्याकिय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे.

    मुंबई : उद्योगपती अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील वोक्हार्ट रुणालयात दाखल होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज वाझेकडून दाखल करण्यात आला आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    तळोजा कारागृहात असलेल्या वाझे यांने ह्रद्याच्या संबंधित त्रास असल्याने न्यायालयाच्या परवानगी नंतर 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्याकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीय करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात वैद्याकिय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे. त्या अर्जावर गुरूवारी सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.