राजभवनातील रक्तदान शिबिरात कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप

  • कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये केले रक्तदान
  • कर्मचाऱ्यांना प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान
  • शिबिरामध्ये एकूण १४० कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच वाळकेश्वर परिसरातील नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले
  • शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले

मुंबई : काही आठवड्यांपूर्वी कोरोनातून मुक्त (corona free) झालेल्या राजभवनातील(Raj bhavan) कर्मचारी (workers) व अधिकाऱ्यांनी (officers) आज राजभवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान मिळवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिबिराचे उद्घाटन करताना रक्तदान करणाऱ्या राजभवनातील नव्या करोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून अनेक गरजू व्यक्तींना जीवनदान मिळते असे सांगून अधिकाधिक लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. कोरोनामुळे लोक भयभीत झाले आहेत. परंतु कोरोनाला न घाबरता योग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी शिबिरामध्ये सर्वप्रथम रक्तदान केले.

राजभवनातील रक्तदान शिबिरात कोरोना मुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान

शिबिरामध्ये एकूण १४० कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच वाळकेश्वर परिसरातील नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले.

शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले होते. कार्यक्रमाला ज. जी. समूह रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ कल्याणी कुलकर्णी, राजभवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद जठार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.