pub

विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं(BMC action on pub) कारवाई केली आहे. सांताक्रूझ वेस्टमधील बॉम्बे अड्डा नावाच्या पबवर (Bombay Adda pub) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा छापा टाकला. पबमध्ये विना मास्क २७५ जण आढळून आले.

मुंबई : विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं(BMC action on pub) कारवाई केली आहे. सांताक्रूझ वेस्टमधील बॉम्बे अड्डा नावाच्या पबवर (Bombay Adda pub) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा छापा टाकला. पबमध्ये विना मास्क २७५ जण आढळून आले. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सगळ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सगळ्यांना मास्कही दिले.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री  दोन हॉटेलवर छापा टाकला. त्यात बॉम्बे अड्डा या पबचा समावेश आहे. बॉम्बे अड्डा येथे विना मास्क आढळून आलेल्या २७५ जणांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दादर येथील एका हॉटेलमध्ये १२० जणांकडून मास्क न घातल्याबद्दल दंड वसूल करण्यात आला. सगळ्यांना मास्क देण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक  मास्क न लावता क्लबमध्ये आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी वागणे सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
मुंबईत  मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाहीयेेत. त्यामुळे लोकांनी आता सुधारलं पाहिजे.  आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे, असेही चहल यांनी सांगितले.