
एकीकडे, कांजुरमार्ग येथे स्टाेरेज(corona vaccine storage) उभारणार असल्याचे निश्चित झाले असताना, दुसरीकडे मात्र पालिका रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्येदेखील स्टाेरेज करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील पालिकेची प्रमुख रुग्णालये व महािवद्यालय केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून विचारण्यात आले आहे की, वॅक्सीन ठेवण्यासाठी तुमच्याकडे कशी, कुठे व किती जागा उपलब्ध आहे याची त्वरीत माहिती देण्यात यावी.
नीता परब, मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक देशांचे लक्ष काराेना वॅक्सीनकडे लागून राहिले आहे. हे वॅक्सीन कधी येणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तर मुंबईतील सायन, केईएम व नायर या तीन महािवद्यालयांमध्ये या वॅक्सीनची चाचणी सुरु आहे. सायन रुग्णालयात बायाेटेक (स्वदेशी) चाचणी सुरु आहे तर केईएम व नायर मध्ये ऑक्सफाेर्ड युनिव्हर्सिटीमार्फत वॅक्सीनची चाचणी सुरु आहे, अशा सकारात्मक चित्र असताना, बनविण्यात आलेली वॅक्सीन स्टाेरेज करण्यासाठी आता युद्ध पातळीवर चर्चा सुरु आहे.
एकीकडे, कांजुरमार्ग येथे स्टाेरेज उभारणार असल्याचे निश्चित झाले असताना, दुसरीकडे मात्र पालिका रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्येदेखील स्टाेरेज करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील पालिकेची प्रमुख रुग्णालये व महािवद्यालय केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून विचारण्यात आले आहे की, वॅक्सीन ठेवण्यासाठी तुमच्याकडे कशी, कुठे व किती जागा उपलब्ध आहे याची त्वरीत माहिती देण्यात यावी. यामुळे येत्या काही महिन्यात मुंबईकरांना कराेना वॅक्सीन उपलब्ध हाेईल,असे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला असून त्यावर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. मागील काही महिन्यांपासून कोरोनावर लस शोधण्याचे भारतासह अनेक देशांत प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका, चीन, पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटने लस चाचणीला सुरुवात केली असून अंतिम चाचणी यशस्वी होताच भारतासह जगभरातील देशांना कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे.
भारतात येत्या दोन – तीन महिन्यांत लस उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीवर मात करणाऱ्या लसीकडे संपूर्ण देश डोळे लावून बसला आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच लसीचा साठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापािलका जागेच्या शाेधात असून मुंबई शहर, पूर्व, व पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी काेल्ड स्टाेरेज उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने नुकताच घेतला आहे. याच निर्णयाबराेबर पालिका आराेग्य विभागाने नायर, केईएम सायन व कूपर या वैद्यकीय महािवद्यालयांमध्येही वॅक्सीन स्टारेज करण्याबाबतचा विचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या चारही वैद्यकीय महािवद्यालयांनी वॅक्सीन ठेवण्याबाबतची इत्यंभूत माहिती पालिका आराेग्य विभागाकडे लवकरात लवकर द्यावी,असे पत्र लिहून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंतचा आकडा २ लाख ८४ हजार १९१ वर पोहोचला आहे. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात असून भविष्यात कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे जगात कुठल्याही देशात कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध झाल्यास लस ठेवण्यासाठी अतिथंड जागेची गरज भासणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने लस कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यासाठी जागेचा शोध सुरु केला आहे. एका कोल्ड स्टोरेज मध्ये हजारो लस ठेवता येतील, अशा जागेचा शोध सुरु असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधकाऱ्याने सांगितले.
कांजुरमार्ग येथे वॅक्सीन स्टाेरेज उभारण्यात येणार आहे पण त्याचबराेबर पालिकेच्या नायर, केईएम व सायन, कुपर रुग्णालयातदेखील लस स्टाेरेज करण्याबाबत चर्चा सुरु आहे.. त्या संदर्भात संबंधित महािवद्यालयांना पत्रही पाठविण्यात आले असून रुग्णालयात किती जागा उपलब्ध आहे? कुठे व कशाप्रकारे ठेवणार याची इत्यंभूत माहिती देण्यात यावी,असे सांगण्यात आले आहे.
- डाॅ. रमेश भारमल, संचालक पालिका प्रमुख रुग्णालय व महाविद्यालय