प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तौक्ते चक्रीवादळाच्या(Tauktae) पार्श्वभूमीवर एक दिवस आधी मुंबई पालिकेने(BMC) बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो सेंटरमधील (Covid Centers Closed) रूग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. या नंतर पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या तिन्ही केंद्रांची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

    मुंबई: तौक्ते चक्रीवादळानंतर(Tauktae Cyclone) पालिकेने बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो कोविड सेंटर (Covid Centers) दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. ही केंद्र पुन्हा १ जूनपासून सुरू करण्याचे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने ही तिन्ही केंद्रे सद्यस्थितीत सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्यास ही तीनही केंद्रे सुरू केले जाणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.

    तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधी मुंबई पालिकेने बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो सेंटरमधील रूग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. या नंतर पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या तिन्ही केंद्रांची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

    पावसाळ्यापूर्वी आणि इतर तातडीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयांची दुरुस्तीही गरजेची होती. दरम्यान, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सध्या रुग्णांची संख्या घटल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही ही तीन जंबो कोविड केंद्रे बंदच ठेवण्यात आली आहेत.

    रुग्णालयात सध्या कोरोना रूग्णांची संख्या कमी असून मोठ्या संख्येने बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे ही केंद्रे कार्यान्वित करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबईत पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास ती त्वरित कार्यान्वित होईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. सध्यास्थितीत मुंबईतील भायखळा, वरळी आणि गोरेगाव येथे तीन जंबो कोविड केअर केंद्रे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.