bmc

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांच्या एका ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक(shivsena and bjp corporator dispute in bmc) एकमेकांना भिडले.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांच्या एका ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले. स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेवू दिला नाही, या कारणावरून भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली.  यशवंत जाधव(yashwant jadhav) यांच्या दालनासमोर भाजप नगरसेवकांनी आज ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना नगरसेवक ही तिथे आले. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांना भिडले आणि दोघांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपने असा आरोप केला आहे की, ही शिवसेनेची दादागिरी आहे. धमकवायंच आणि काम करु द्यायचं नाही, अशी यांची पद्धत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही चांगलं काम करताना काहीतरी करुन मध्ये खोडा घालायचा हे त्यांनी ठरवलं आहे, असं जाधव यांनी म्हटले आहे.

ही शिवसेनेची दादागिरी आहे. धमकावणे आणि काम करु न देणे, ही यांची पद्धत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे आरोप फेटाळले आहे. आम्ही चांगले काम करत आहोत. मात्र, काहीतरी करुन खोडा घालण्याचे काम ते करत आहेत, असा पलटवार भाजपवर केला.