मुंबई महापालिकेचे पर्यावरणपूरक पाऊल, वाहन ताफ्यात सामील झाली ५ इलेक्ट्रिक वाहने

मुंबई महापालिकेच्या(BMC) वाहन ताफ्यात पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनावरील वाहनांमध्ये शुक्रवारपासून पाच वाहनांचा समावेश झाला आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेइकल या मॉडेलची ही (Electric Vehicles)५ वाहने आहेत.

    मुंबई: मुंबई महापालिकेच्या(BMC) वाहन ताफ्यात सध्या पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनावरील ९६६ वाहने आहेत. मात्र पर्यावरण पूरक असलेली इलेक्ट्रिक वाहने असणे काळाची गरज असल्याने पालिकेच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles)आली आहेत.

    मुंबई महापालिकेच्या(BMC) वाहन ताफ्यात पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनावरील वाहनांमध्ये शुक्रवारपासून पाच वाहनांचा समावेश झाला आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेइकल या मॉडेलची ही ५ वाहने आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने या वाहनांची सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहे.

    या वाहनांसाठी दरमहा २७ हजार इतका खर्च येणार आहे. यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये पारंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बन डायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत. पर्यावरण पूरक असलेली वाहनांचा प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.