विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांमुळे मुंबई पालिकेची भरली तिजोरी, ५४८ दिवसांत ७१ कोटी ३४ लाखांची कमाई

मुंबई पालिकेने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाईचा(Action On Citizen Not Wearing Mask) बडगा उगारला असून २० एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ या ५४८ दिवसांत ३४ लाख ८४ हजार ८४ जणांवर कारवाई केली आहे. तर ७१ कोटी ३४ लाख ४७ हजार ४०० रुपये दंड(Fine Collection Of BMC) वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

    मुंबई: कोरोनाला(Corona) रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अजूनही अनेकजण बेजबाबदारपणे मास्कविना फिरत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पालिकेने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाईचा(Action On Citizen Not Wearing Mask) बडगा उगारला असून २० एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ या ५४८ दिवसांत ३४ लाख ८४ हजार ८४ जणांवर कारवाई केली आहे. तर ७१ कोटी ३४ लाख ४७ हजार ४०० रुपये दंड(Fine Collection Of BMC) वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथ रोग कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर तिसऱ्या लाटेचा इशारा आरोग्य तंज्ञानी दिला आहे. मात्र अजूनही अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करून विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क लावणे आवश्यक असतानाही अनेकांकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. त्यामुळे पालिकेने २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत भरारी पथके तैनात केली आहेत. पोलीस व रेल्वे प्रशासनाला विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, २० एप्रिल २०२० पासून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ३४ लाख ८४ हजार ८४ नागरिकांवर कारवाई करत ७१ कोटी ३४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

    लोकलमधूनही विनामास्क
    मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वमधून प्रवास करणाऱ्या विना मास्क प्रवाशांवर करावी केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ प्रवाशांवर कारवाई करत ५० लाख ३९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.