
गेल्या पंधरा दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून, महापालिकेच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे(BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल(iqbalsingh chahal) यांनी मुंबईकराना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांच्या(corona patients) संख्येत तिपटीने वाढ झाली असून, महापालिकेच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे(BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल(iqbalsingh chahal) यांनी मुंबईकराना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एका मुलाखतीत त्यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं.
मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल बोलताना आयुक्त चहल म्हणाले,“वाढत्या रुग्णसंख्येमुळे धोका आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही आणि आता हजारो लोकं विनामास्क फिरताना दिसत आहे. काल (२१ फेब्रुवारी) आम्ही १६ हजार ४०० लोकांकडून दंड वसूल केला. मागील तीन महिन्यात १६ लाख लोकांना दंड आकारला आहे. आता दररोज विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या २५ हजार लोकांकडून दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे.”
चहल पुढे म्हणाले की, “माझ्याकडे दोन व्हिडीओ आले आहेत. एक व्हिडीओ चौपाटीवरचा होता. हजारो लोकं तिथं होते. तिथे विनामास्क लोकं फिरत होते. एक लग्नातील व्हिडीओ आला. तिथंही हेच दृश्य होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दंड ठोठावला. अनेक ठिकाणी पबवरही धाडी टाकल्या. हा सगळा बेशिस्तपणा आहे,” अशा शब्दात आयुक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.
आयुक्तांनी सांगितलं की, कोरोना संपलाय असं सगळ्यांना वाटतंय. लोक कोणतीही काळजी न घेता वावरत आहेत, हे धोक्याचे आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत जे बोलले ते योग्यच बोलले. कोरोनाचे नियम पाळायला हवेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. मास्क वापरायला हवा. लोक हजारोंच्या संख्येने विनामास्क फिरायला लागले तर लॉकडाऊन टाळता येणार नाही. पुढचे ८-१० दिवस खूप महत्वाचे आहेत.