bmc commissioner Iqbal Singh Chahal gives orders to bmc staff to contact disaster management control room due to power failure in mumbai and mmr region

टाटा पावरच्या (tata power) ग्रीडमध्ये (grid) तांत्रिक बिघाड (technical fault) झाल्याने याचा फटका मुंबईसह महानगर परिसरालाही बसला. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी (mumbai municipal commissioner) सर्व विभागांना हे आदेश दिले आहेत.

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व रुग्णालये कमीतकमी आठ तास डिझेलचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी त्यांच्या संबंधित एसडब्ल्यूएम ट्रान्सपोर्ट गॅरेज अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील जेणेकरुन रुग्णालयांमध्ये विशेषत: आयसीयूमध्ये कोणत्याही प्रकारची वीज बिघाड होणार नाही. काही समस्या असल्यास कृपया मदतीसाठी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. यावर समन्वय साधण्यासाठी सीई एसडब्ल्यूएम यांनी देखरेख करावी असे आवाहन महापालिका आयुक्त ईक्बालसिंग चहल यांनी केले आहे.  टाटा पावरच्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने याचा फटका मुंबईसह महानगर परिसरालाही बसला. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना हे आदेश दिले आहेत.
वीजपुरवठा संबधित बिघाड हा दोन तासांहून अधिक काळ असाच सुरू राहिल्यास पुढल्या एक तासाच्या आत मोबाईल डीजी एसईटी वाहने सज्ज ठेवावीत. यासंबंधीची माहिती दर अर्ध्या तासाने आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी नार्वेकर किंवा संगिता लोखंडे यांना वेळोवेळी द्यावी अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे.