कोरोना उपचारात मुंबई पालिकेची चतु:सुत्री – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडूनही कौतुकाची थाप

मुंबई :मुंबई पालिकेकडून कोरोना उपचारासाठी चतु:सुत्रीचा वापर करण्यात आला असून मोबाईल फीवर क्लिनिक, खासगी डॉक्टरांना सहभागी करुन घेणे, प्राणवायू पुरवठा करणाऱ्या खाटांवर भर व दारोदारी जावून

 मुंबई : मुंबई पालिकेकडून कोरोना उपचारासाठी चतु:सुत्रीचा वापर करण्यात आला असून मोबाईल फीवर क्लिनिक, खासगी डॉक्टरांना सहभागी करुन घेणे, प्राणवायू पुरवठा करणाऱ्या खाटांवर भर व दारोदारी जावून सर्वेक्षण या चतु:सुत्रीचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. मुंबई वापरत असलेले कोरोना प्रतिबंधात्मक पॅटर्न आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने  मुंबई महानगर पालिकेकडून कोरोना स्थिती हाताळली जात आहे त्याचे कौतूक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडूनही (आयसीएमआर) होत असल्याचे‌ ट्विट पालिका आरोग्य समितीचे‌ अध्यक्ष अमेय घोले यांनी नुकतेच केले आहे.

मुंबईतील कोरोनाच्या मागे मुंबई महानगरपालिका लागली असून उपचार पद्धतींमध्ये बदल केल्यामुळे मोठ्या संख्येने तपासणी शक्य झाली आहे. कोरोना निरीक्षण समितीकडून वारंवार मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे कोरोना हारणार असल्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुंबई वापरत असलेले कोरोना प्रतिबंधात्मक पॅटर्न आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याचा कोरोना काळ मुंबईसाठी परिक्षेचा काळ आहे. दाट लोकसंख्येतही कोरोना रुग्ण शोधणे, त्याला उपचारासाठी आयसोलेट करणे, पुढे संसर्ग पसरु नये याची काळजी घेणे, हे‌ सर्व आव्हानात्मक होते. तरीही आव्हान स्वीकारुन पालिका अधिकारी कामाला‌ लागले आहेत. समोरील स्थिती नुसार निर्णय घेण्यात येत होते. तर काही वेळा स्थितीनुसार निर्णय बदलण्यात येत आहेत. डोअर टू‌ डोअर सर्वेक्षण सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिक वर्गाला दिलासा मिळाला. तर एप्रिल महिन्यापासून मोबाईल फीवर क्लिनिकवर भर दिल्याने झोपडपट्ट्या चाळ सदृश्य परिसरातील तापसरीच्या रुग्नांची तपासणी शक्य झाली. यामुळे फक्त तापाचे‌ व कोव्हिड रुग्ण‌ अशी वर्गवीरी शक्य झाली.पालिकेचा मोबाईल फीवर क्लिनिकचा निर्णय यशस्वी झाला. लगेचच खासगी डॉक्टरांना सहभागी करुन घेण्याबाबतचा निर्णय पालिकेने घेतल्याने डॉक्टर तुटवड्याचे प्रमाण किंचित कमी झाले. मात्र यामुळे सरकारी रुग्णालयातील संसर्ग होणाऱ्या डॉक्टरांना तात्पुरता दिलासा मिळाला. विशेष म्हणजे रुग्णासाठी प्राणवायू पुरवठा करणाऱ्या खाटांवर भर देण्यात आल्याने रुग्ण मोठ्या संख्येने बरे‌ होत आहेत.