बीएमसीत कोरोना लस घोटाळा;  किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर आरोप

कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये देखील राज्यातील राजकारण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बनावट असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    मुंबई : कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये देखील राज्यातील राजकारण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बनावट असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा. काल टेंडरची मुदत संपत होती, तर एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बोगस आहेत, कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही, तेच डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली. गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका-ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला होता.

    मुंबईतील नालेसफाईवरून काँग्रेस-शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने शहरात 102 टक्के, पूर्व उपनगरात 93 टक्के तर पश्चिम उपनगरात 96 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. या आकडेवारीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पालिकेचा हा दावा खोटा असून ठेकेदारांना मदत करण्यासाठी नालेसफाईचे आकडे फुगवले जात आहेत, असा आरोप बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

    मुंबई महापालिका मुंबईतील नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. लवकरच याची खरी माहिती समोर आणली जाईल असेही राजा म्हणाले.