मुंबई पालिका कर्मचारी आक्रमक भूमिकेत, ८ ऑक्टोबरला विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च

मुंबई (Mumbai) पालिकेतील लिपिकीय कर्मचाऱ्यांची आज ऑगस्ट क्रांती मैदान (August Kranti Maidan)येथे सभा झाली. या सभेस सुमारे १२०० लिपीक उपस्थित हाेते. या सभेला दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने, उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे आणि हिंदुस्थान कर्मचारी संघाचे अध्यक्ष. दिवाकर दळवी यांनी मार्गदर्शन केले.

    मुंबई: मुंबई(Mumbai) पालिकेचे मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या पदांच्या कालबद्ध पदोन्नतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करून, त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी तसेच इतर मागण्यांसाठी येत्या ८ ऑक्टाेबर राेजी पालिका कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च(Long March) काढण्याचा निर्णय दि म्युनिसिपल युनियनने (The Municipal Union)घेतला आहे.

    पालिकेतील लिपिकीय कर्मचाऱ्यांची आज ऑगस्ट क्रांती मैदान येथे सभा झाली. या सभेस सुमारे १२०० लिपीक उपस्थित हाेते. या सभेला दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने, उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे आणि हिंदुस्थान कर्मचारी संघाचे अध्यक्ष. दिवाकर दळवी यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी मुंबई महापालिकेतील सुमारे १८०० लिपिकीय कर्मचाऱ्यांनी २० दिवसांच्या रजेचे अर्ज महापालिका प्रशासनाला सादर केलेले आहेत. कर्मचान्याचे वेतन त्यांच्या रजेमुळे अडले जाईल, या कारणास्तव सामुहिक रजेचा निर्णय स्थगित करून, येत्या ८ ऑक्टोबर रोजी लॉगमार्च काढून आयुक्त आणि महापौर यांना भेटायला जायचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युनियमचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.