BMC ची घरोघरी लसीकरण मोहिम! कुणाला दिली जातेय घरी जाऊन लस? घरात लस घेण्यासाठी पाहिजे फक्त एक पत्र

सहा महिन्यांहून अधिक काळापासून बेडवर उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण मुंबईत १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आले आहे. एकूण ४ हजार ५२५ नागरिकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. मागील २२ दिवसांत त्यापैकी दोन हजार ५२५ नागरिकांना घरोघरी जाऊन लशीचा डोस टोचण्यात आला आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्यापैकी दोन हजार ज्येष्ठांचे लसीकरण शिल्लक आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नोंदणीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

  मुंबई : ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेले आणि आजारी असलेल्या, लसीकरण केंद्रावर नेणे शक्य नसलेल्या मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी लसीकरण मोहिम १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या ४ हजार ५२५ पैकी आतापर्यंत २२ दिवसांत दोन हजार ५२५ जेष्ठ नागरिकांचे लसीचा डोस देण्यात आला आहे. अजून दोन हजार ज्येष्ठांचे लसीकरण व्हायचे आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  सहा महिन्यांहून अधिक काळापासून बेडवर उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण मुंबईत १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आले आहे. एकूण ४ हजार ५२५ नागरिकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. मागील २२ दिवसांत त्यापैकी दोन हजार ५२५ नागरिकांना घरोघरी जाऊन लशीचा डोस टोचण्यात आला आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्यापैकी दोन हजार ज्येष्ठांचे लसीकरण शिल्लक आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नोंदणीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

  लसीकरणासाठी काय आवश्यक

  लसीसाठी नोंदणी आवश्यक आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आणि अंथरुणावर खिळलेल्यांसाठी लस घरोघरी दिली जाते. रुग्णाला फॅमिली डॉक्टरकडून लस घ्यावी का, असे होकारार्थी पत्र आणणे बंधनकारक आहे.

  मुंबईत एकूण ८५ लाख नागरिकांचे लसीकरण

  मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ८५ लाख नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. आतापर्यंत पहिला डोस ६३ लाख ४० हजार जणांनी तर दुसरा डोस २१ लाख ६० हजार नागरिकांनी घेतला आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]