कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिका सज्ज, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून करणार काॅन्सन्ट्रेटरची खरेदी

ऑक्सिजनचा तुटवडा(Oxygen Shortage) जाणवू नये यासाठी मुंबई पालिका(BMC) १० लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे १२०० नग खरेदी करणार आहेत. या उपकरणाची किंमत १० काेटी ४२ लाख रुपये इतकी आहे.

    मुंबई: संभाव्य तिसरी लाट(Third Wave) येण्याचा धाेका लक्षात घेवून ऑक्सिजनचा तुटवडा(Oxygen Shortage) जाणवू नये यासाठी मुंबई पालिका(BMC) १० लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे १२०० नग खरेदी करणार आहेत. या उपकरणाची किंमत १० काेटी ४२ लाख रुपये इतकी आहे. पालिकेच्या येत्या साेमवारी हाेणाऱ्या स्थायी समितीच्या(Standing Committee Meeting) बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.

    काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी पालिकेची विविध रुग्णालये आणि काेविड सेंटरमध्ये काेराेनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचारावेळी रुग्णांना कृत्रिम श्वसनासाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचा वापर केला जाताे. नव्याने उभारण्यात येणार्या काेविड सेवा केंद्रांच्या मागणीनुसार १० लिटर क्षमतेचे १२०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर नग खरेदी करण्यात येणार आहे. ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पुरविण्याबाबत मे. बायाेट्राॅनिक्स इक्युपमेंट प्रा. लिमिटेड, मे. श्रध्दा डिस्ट्रिब्युटर्स, मे. हेमंत सर्जिकल इंडस्ट्रिज लि. या तीन निविदाकारांचा प्रतिसाद मिळाला हाेता. त्यापैकी लघुत्तम निविदाकार असलेले मे. श्रध्दा डिस्ट्रिब्युटर्स यांनी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे १० लिटरचे १२०० नग पुरविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

    यंत्राच्या उपकरणाचा पुरवठा यंत्राच्या किंमतीच्या ८० टक्के रक्कम दिल्यानंतर करण्यात येईल. उर्वरित २० टक्के रक्कम उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर आणि कंत्राट कराराच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर कण्यात येईल. यंत्राचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर दाेन वर्षे सर्व समावेशक परिरक्षण कालाधी असेल. १२०० उपकरणासाठी पालिका १० काेटी ४२ लाख रुपये माेजणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची लवकरच मंजुरी मिळणार आहे.