corona virus

एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी पालिका प्रशासन दिवस रात्र एक करत असून दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह(corona dead body) बंदिस्त करण्यासाठी पालिकेला जवळपास १० कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

नीता परब, मुंबई: मुंबईला पडलेला कोरोनाचा(corona) विळखा आता सैल झाला असला तरी या कोरोनाने शहरात हजारोंचा जीव घेतला आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी पालिका प्रशासन दिवस रात्र एक करत असून दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह(corona dead body) बंदिस्त करण्यासाठी पालिकेला जवळपास १० कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम मागील नऊ महिने मुंबई महापालिका राबवत आहे. या कामी विशिष्ट प्रोत्साहन भत्ता कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. आतापर्यंत मृतदेह बंदिस्त करण्यासाठी पालिकेने १० काेटी ९९ लाख एक हजार रुपये खर्च झाले असल्याचे पालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत मार्च ते ऑगस्ट या महिन्यादरम्यान काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच हाेती. तर मागील दाेन महिन्यांची मुंबईतील काेराेनाबाधित रुग्णांची आकडेवारी पाहता, ही रुग्णसंख्या व मृत्यूची आकडेवारीही घटली असल्याची सकारात्मक बाब समाेर येत आहे.

दुसरीकडे, मार्च ते ऑगस्ट या दरम्यान मृत्यूचा आकडा हा भयावह हाेता, त्यामुळे काेराेना मृतदेह बंदिस्त करण्याचे जाेखमीचे काम करताना पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. जीव धाेक्यात घालून हे काम केले जात हाेते, पण कर्मचाऱ्यांना काेणतेही सुरक्षा कवचही नव्हते. ज्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना विमा कवच याशिवाय काेराेना मृतदेह बंदिस्त करणाऱ्या पालिकेच्या नियमित कर्मचारी, कंत्राटी, राेजंदारी यापैकी काेणत्याही कर्मचाऱ्याने मृतदेह बंदिस्त करण्याचे काम केल्यास त्याला ५०० रुपये राेख रक्कम दिली जाईल, या कामात दाेन व्यक्तींचा सहभाग असल्याने १००० रुपये दिले जातील, असे एक पत्रक काढण्यात आले हाेते. ज्यामुळे शास्त्राेक्त पध्दतीेने अंत्यसंस्कार करण्याकरीता आतापर्यंत तब्बल दहा काेटी रुपये पािलका आराेग्य विभागाने खर्च केले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मार्च एप्रिल महिन्यात काेराेना मृतदेह बंदिस्त करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण हाेते सुरुवातीला सुरक्षेची साधनेही कर्मचाऱ्यांना मिळत नव्हती, नंतर आराेग्य विभागाने विमा कवच यािशवाय दरराेज भत्ता शिवाय काेराेना मृतदेह बंदिस्त करण्याकरीता एक हजार रुपये प्राेत्साहन भत्ता देण्याकरीता सुरुवात केली. तसेच आराेग्य विभागाकडून देण्यात येणारे भत्ते कर्मचाऱ्यांना नियमित मिळू लागले. आराेग्य विभागाकडून मिळत असलेलल्या साेयी-सुविधांमुळे कर्मचारीदेखील सुरक्षेबाबत निश्चिंत झाले- प्रदिप नारकर, चिटणीस म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई

मुंबईतील मागील नऊ महिन्यांतील काेराेना आकडेवारी
मुंबईत आतापर्यंत बाधित रुग्ण – २,९१,६३४
बरे झालेले रुग्ण -२,६५,७१५
ॲक्टिव्ह रुग्ण -१४,०९६
इतर कारणामुळे झालेले मृत्यू – ८३२
 काेराेनामुळे झालेले मृत्यू – १०,९९१