कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका करणार डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉयची भरती

मुंबई :मुंबईत सर्वाधिक दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रसार हळूहळू वाढू लागला आहे. त्याला रोखण्यासाठी १२० डॉक्टर्स, परिचारिका आणि वॉर्डबॉयची तात्काळ भरती केली जाणार आहे. त्यामुळे

 मुंबई :मुंबईत सर्वाधिक दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रसार हळूहळू वाढू लागला आहे. त्याला रोखण्यासाठी १२० डॉक्टर्स, परिचारिका आणि वॉर्डबॉयची तात्काळ भरती केली जाणार आहे. त्यामुळे धारावीसह दादर, माहीम परिसरात कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिकेच्या मोहिमेला मोठी बळकटी मिळणार आहे. मुंबईत कोरोनाचा सरसकट प्रसार आणि मृत्यूचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी दाटीवाटीचा आणि अनेक झोपडपट्टांचा परिसर असलेल्या धारावीत मात्र, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, कोरोनाला रोखण्यासाठी तात्काळ २० डॉक्टर्स, ५० परिचारिका आणि ५० वॉर्डबॉय आणि शिपायांची भरती केली जाणार आहे. कोरोना सेंटरमध्ये यांची नेमणूक केली जाणार असून डॉक्टरांसाठी एमबीबीएस/बीएएमएस/बीएचएमएस, परिचारिकांसाठी पदवी/पदविका नर्सिंग आणि मिड वायफरी (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत) तर वॉर्डबॉय आणि शिपाई पदासाठी १० वी पास अशी शैक्षणिक अट आहे. कोरोनासाठी केलेली ही विशेष भरती असून कंत्राटी पद्धतीची आहे. यासाठी १८  तारखेला पालिकेच्या जी/उत्तर कार्यालयात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जी/उत्तर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिली.